सुर्यकांत साळुंके यांनी गडनदीतील स्वखर्चाने काढला गाळ.

सुर्यकांत साळुंके यांनी गडनदीतील स्वखर्चाने काढला गाळ.

आरवली: (सचिन पाटोळे)

संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावामधुन वाहत असलेल्या गडनदीतील पाणी पावसाळ्यात गावामध्ये शिरत असल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना जिव मुठीत घेऊन रहावे लागत होते.
याआधीही साळुंके यांनी पाठ बंधारे विभागाकडे पाठपुरावा करून गडनदीला संरक्षण भिंत बांधून घेतली होती.मात्र पाठ बंधारे विभागाकडून बांधलेल्या संरक्षण भिंतीची उंची कमी झाल्यामुळे संरक्षण भिंतीवरुन पाणी गावात शिरते.
मागील दोन वर्षांपासून संबंधित समस्या बाबत बरेचशे नेते गावात येऊन ग्रामस्थांसोबत सर्वे करणे आणि फोटो काढून बातम्या करणे इतकाच दिखावा अजुन पर्यंत केला पण साळुंके यांनी असे काहीही न करता जेसीबी लावून काम सुरू केले असे ग्रामस्थांनी सांगितले.
अशाच प्रकारे पंचक्रोशीतील रातांबी,येडगेवाडी, कदमवाडी,काळंबेवाडी,मधे लोकांच्या समस्या व गरजा ओळखून स्वखर्चाने वाडीवाडीमधे विकास कामे केली आहेत.
एखादी विकास योजना असुदे कींवा कार्यकर्त्यांचे काम असो ते अगदी जोमाने आणि तडफेने मार्गी लावल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही . समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी , सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आणि आपुलकी यातुनच उद्योग सांभाळुन लोककल्याणाचा वसा कायम जोपासनारे उद्योजक म्हणून संगमेश्वर तालुक्यात नावारुपास असलेले श्री सुर्यकांत साळुंके यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.