स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन
शिरोळ: राम आवळे
दि .१८ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
त्याचप्रमाणे स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक ज्योतीकुमार पाटील यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक अमर यादव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील दादा संचालिका विनया घोरपडे,संचालक अनिलकुमार यादव,इंद्रजित पाटील, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, अॅड.प्रमोद पाटील,दरगू माने-गावडे, निजामसो पाटील, संचालिका संगिता पाटील-कोथळीकर, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील-हालसवडे,मंजूर मेस्त्री तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी सत्यजित उर्फ नाना कदम , मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,पंचगंगा साखर संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील,गजानन संकपाळ, दत्त वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर,माजी नगरसेवक तात्या पाटील,योगेश पुजारी, बाळासाहेब कोळी, धिरज लंगरे, भालचंद्र लंगरे, आर .के.पाटील, संजय राजपूत,संभाजी भानुसे,विशाल माळी, क्षारपड प्रकल्पाचे इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे व त्यांचे सर्व सहकारी, राजू हरळीकर,शीतल उपाध्ये,सुरेश सुतार,कुमार बुबने,अमोल चव्हाण,बजरंग संकपाळ,मनोहर माळी, दगडू माने,सुनिल इनामदार, बाळासाहेब कोळी(दिवान), महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व सभासद, कार्यकर्ते तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, पॉलिटेक्निक कॉलेज,आयटीआय चे प्राचार्य सर्व शिक्षकवर्ग, तसेच दत्त भांडारचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.