थकीत मानधन लवकरच वितरित होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई : भारतीय बहुजन कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार माननीय संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी थकीत मानधन तातडीने वितरित करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारचे मानधन मे अखेरपर्यंत तर केंद्र सरकारचे मानधन मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात वितरित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा :
1. दरमहा ५ तारखेपूर्वी मानधन वितरणाची व्यवस्था करण्याबाबत चर्चा.
2. छत्रपती संभाजीनगर शहरात आशा सेविकांना हजेरी ॲपमध्ये फोटो अपलोड सक्तीबाबत चर्चेसह स्वतंत्र बैठक घेण्याची विनंती.
3. राज्यातील सर्व आशा सेविकांना लवकरच आशा रजिस्टर मिळणार.
4. गटप्रवर्तक निवडीचे निकष लवकरच सुधारले जाणार.
5. आशा सेविकांच्या युनिफॉर्मचा रंग अंगणवाडी सेविकांपासून वेगळा ठेवण्याबाबत चर्चा. गुलाबी रंग वापरण्याचा विचार.
6. दोन महिन्यांत आशा सॉफ्टवेअर सुरू होणार असून गटप्रवर्तकांसाठी सॉफ्टवेअर भत्त्याचीही अंमलबजावणी होणार.
7. गटप्रवर्तकांना PIP मनुष्यबळात समाविष्ट करून कंत्राटी दर्जा देण्याबाबत केंद्राकडे पाठवलेले पत्र व त्याचा पाठपुरावा.
8. गटप्रवर्तकांच्या स्वतंत्र बैठकासाठी आयुक्तांकडे वेळ मागण्यात आला.
9. आशा प्रोग्रामिंग ऑफिसर स्वाती पाटील मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन घेण्यात आले.
शिष्टमंडळामध्ये सहभागी :
राज्य अध्यक्षा नेत्रदीपा पाटील (कोल्हापूर), राज्य सचिव डॉ. प्रविण चौधरी (जळगाव), संजीवनी पाटील (मुंबई), मानसी विटेकर (छत्रपती संभाजीनगर), राधिका घाटगे (कोल्हापूर), रेखा गायकवाड, अर्चना जोशी (छत्रपती संभाजीनगर) यांनी सहभाग घेतला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.