अशोक जाधव यांची काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती
संगमेश्वर: (साद्दीक साद्दीक)
अशोक वासूदेव जाधव हे एक मराठी राजकारणी व सध्या रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ पाटोले यांनी मान्यता दिल्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पदावर माननीय अशोक वासूदेव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पुर्वी सामाजिक न्याय विभाग पुनर्वसन सदस्य महाराष्ट्र शासन)म्हणून त्यांनी योग्य रित्या आपली जबाबदारी बजावली आहे.
उत्कृष्ट राजकारणी,सामाजिक कार्यकर्ता,मा.सामाजिक न्याय व पुनर्वसन सदस्य (महाराष्ट्र शासन),शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष,रत्नागिरी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम केलेले अनुभव असणारा कार्यकर्ता म्हणून यांची ओळख अशोक जाधव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्हात कौतुक केले जात आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.