साखरपा महाविद्यालयामध्ये सजला रानभाज्यांचा महोत्सव

साखरपा:
प्रा. आबाजी सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय साखरपा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला.या महोत्सवचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ किरबेट संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.या महोत्सवामध्ये एकूण २० स्टॉल होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी रानामधील विविध भाज्या,भारंगी,टाकळा,शेवग्याचे पान,रोवन,थरमळा,मायाळू,ओवा,रानअळू,रानकेळी,आकूर, कुरडू अश्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचे विविध प्रकार केले होते.या प्रकारामध्ये रानभाज्यांचे कटलेट,सरबत,पराठे,भाजी,पकोडे,केक चटणी मोदक,करंजी,मोमोज वडी असे ननाविध प्रकार विध्यार्थ्यांनी तयार केले होते.यामध्ये खास आकर्षण म्हणजे रानभाज्यांचा केक मोदक करंजी आणी ओव्याच्या पानांचे सरबत ठरले.असा विविध अंगी कोकणातील रानभाज्यांचा महोत्सव साजरा करण्यात आला.महोत्सव ला शुभेच्छा देताना प्रा.आबाजी सावंत यांनी महाविद्यालयामध्ये हा प्रथम नावीन्यपूर्ण असा महोत्सव आहे व या माध्यमातून तुमची आवड व गृहिणींचे कौशल्य महत्वाचे आहे,नोकरी,व्यवसाय व शेतीच्या कामामधून देखील गृहिणी अनेक पदार्थ चवीने बनवतात.त्यामुळे तुमच्या सर्व पालकांचे देखिल मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन केले.

             महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर मगदूम यांनी आपल्या कोकणातील डोंगराळ भागात मिळणाऱ्या परंतु लोप पावत चाललेल्या भाज्या प्रदर्शनातून प्रकाशात आणण्याचे महत्वाचे काम विद्यार्थ्यांनी केले.या भाज्यांचे आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्वाचे स्थान आहे.अनेक आजारांवरती या भाज्या खूप महत्वाच्या आहेत.या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संस्कृतिक विभागाच्या प्रा.राजश्री बन्ने व प्रा.सोनाली शिंदे यांनी विशेष सहकार्य होते.महोत्सवातील पदार्थांचे परीक्षक म्हणून प्रा.शिल्पा वैद्य,प्रा. सुरज लिंगायत व रमाकांत शिंदे यांनी काम केले.महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक व सर्व विध्यार्थ्यांनी सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.