नावडी निनावी देवी मंदिर येथे नवरात्र घट स्थापना व अखंड हरीनाम सप्ताह आरंभ

संगमेश्वर:
शारदीय नवरात्रिचा आरंभ 26 सेप्टेंबर सोमवार पासून सुरु होणार आहे। परंतु यामध्ये सर्वात महत्वपूर्ण म्हणजे घट स्थापना । नवरात्रिच्या एक दिवस अगोदर आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथिला मुहूर्त मानून कलश बसवला जातो.असे मानतात कि याद्वारे नवरात्रिवर देवीची उपासना पुर्ण होते.
नावडी येथील निनावी देवी मंदिर येथे सोमवार दिनांक २६/०९/२२ रोजी शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेला आरंभ होणार मोठ्या उत्साहाने या मंदिरात भाविक,भक्त,माहेरवाशिणी व त्यांचे परिवार दर्शनाला येत असतात.नवस बोलले जातात,मनात बोललेल्या इच्छा पुर्ण झाल्यानंतर भाविक येथे येऊन देवीच्या चरणापाशी नवस फेडतात.याठिकाणी बावा सुर्वे (खोत)म्हणून कार्यभार संभाळत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.