News Aditor रत्नागिरी :-(मुजीब खान)
कडवई जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांंनी सर्व शिवसैनिकांचे दैवत असलेल्या ज्यांनी मराठी अस्मिता धगधगत ठेवली त्या हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेबांची ९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
रत्नागिरी जिल्हा परीषद मा.अध्यक्ष संतोषजी थेराडे यांनी वंदनिय बाळासाहेबांना अभिवादन करताना साहेबांचा विचार घराघरात पोहचवून प्रत्येक घरात शिवसैनिक निर्माण करुन आदरांजली अर्पण करु असे सांगितले .
यावेळी उपस्थित जिल्हा परीषद सदस्य शंकर भुवड , विभागप्रमुख अनंतजी उजगांवकर , उपविभागप्रमुख अरविंदजी जाधव ,ग्रां.पं सदस्य रामचंद्र हरेकर , उद्योजक विजयजी कुवळेकर , श्री आदावडे , श्री.मुकुंद गुरव आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.