नेपाळमधील साऊथ एशियन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात कडवईतील तरुणाची निवड

संगमेश्वर: मुजीब खान 
नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात कडवईमधील सुपुत्र युवराज गायकवाड ची निवड करण्यात आली आहे.युवराज गायकवाड या खेळाडूची या स्पर्धेसाठी निवड झाली असून, हा  खेळाडू कडवई पाटील वाडी येथील आहे. त्याची ही निवड कडवई-पाटीलवाडीवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
कडवई पाटील वाडी येथे सामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेल्या ह्या तरुणाला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड असून, क्रिकेटमध्ये त्याचे उत्तम वर्चस्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या क्रिकेट संघात हा तरुण क्रिकेटपटू खेळत आहे . यामुळे सिनिअर नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेत त्याला प्रथमच भारतीय टेनिस क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली भारतीय टेनिस क्रिकेट संघात कडवई पाटील वाडी येथील युवराज गायकवाड या तरुणाची नेपाळमधील पोखरा येथे दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी 2022 तारीख दरम्यान होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी, टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाकडून निवडपत्र देण्यात आले आहे. या तरुणांच्या उत्कृष्ट खेळामुळे संपूर्ण देशात कडवईकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.