संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरीचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरव

लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटीला देखील आले गौरविण्यात

संगमेश्वर:-
रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन व लांजातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या मुस्लीम वेल्फेअर सोसायटी या दोन संस्थाना नवनिर्मिती फाउंडेशन उक्शी रत्नागिरी या संस्थेच्या वतीने गुरुवारी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.नवनिर्मिती फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षीच्या राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारासाठी लांजा येथील मुस्लीम वेल्फेअर सोसायटी आणि रत्नागिरी व लांजा येथे कार्यरत असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशन या दोन संस्थांची निवड करण्यात आली होती. १६५ संस्थांमधून ही निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला चिपळूणचे आमदार शेखर निकम, उद्योजक किरण सामंत, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते ,नवनिर्मिती फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज आदी मान्यवर उपस्थित होते.सदर राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार स्वीकारताना संपर्क युनिक फाउंडेशन फाउंडेशन चे अध्यक्ष शकील गवाणकर ,तालुका अध्यक्ष जमीर खलीपे, महिला संघटक निक्कत डिंगणकर, को-ऑर्डिनेटर निकिता कांबळे मुस्लिम वेलफेअर सोसायटीचे कार्याध्यक्ष अकिल नाईक, अध्यक्ष रफिक नाईक, महिला अध्यक्षा दिलशाद नाईक, युवा अध्यक्ष साहिल पन्हळेकर ,सल्लागार हसन मुजावर, सईद खान आदी उपस्थित होते.

43