कडवई:
परचुरी गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार प्रदिप विश्राम चंदरकर यांना शाळा कोळंबे हायस्कूल येथे शिकत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली व त्यांनी जोपासली आहे.गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्यास 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी मार्च गहिन्यात रोप्य महोत्वव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसभापती पर्शुराम वेल्ये,सरपंच,उपसरपंच,सदस्य,माजी सैनिक,विविध संस्थांचे मान्यवर,बचतगटातील महिला,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आदींनी रौप्य महोत्सवाला उपस्थिती दर्शविली होती.