प्रसिध्द गणेश मूर्तीकार प्रदीप चंदरकर यांच्या गुरुकृपा आर्ट कारखान्याचे २६ व्या वर्षात पदार्पण

कडवई:

परचुरी गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार प्रदिप विश्राम चंदरकर यांना शाळा कोळंबे हायस्कूल येथे शिकत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली व त्यांनी जोपासली आहे.गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्यास 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी मार्च गहिन्यात रोप्य महोत्वव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसभापती पर्शुराम वेल्ये,सरपंच,उपसरपंच,सदस्य,माजी सैनिक,विविध संस्थांचे मान्यवर,बचतगटातील महिला,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आदींनी रौप्य महोत्सवाला उपस्थिती दर्शविली होती.
गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्याने २६ व्या वर्षात पदार्पण केले आहे.या कामात त्यांना आई,मुले,पत्नी व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी लाभले.प्रदिप चंदरकर यांच्या कारखान्यात सर्वात मोठी गणेश मूर्ती ४ फुटी आहे.त्यांच्या गुरुकृपा आर्ट कारखान्यातील गणेश मूर्त्या परिसरातील आंबेड,वांद्री,उक्षी,फुणगुस,उपळे,ओझरखोल आदी खाडी किनारी भागातील गावात प्रसिध्द आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.