रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेला 10 चाकी डंम्पर केला जप्त

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी:प्रतिनिधि 

दि:३०:मे:रत्नागिरी पोलीसांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेला 10 चाकी डंम्पर केला जप्त

दि. 14-05-2023 रोजी 20.30 ते 15-05-2023 रोजी 07.00 वा चे दरम्यांने इसार पेट्रोलपंप निवळी ता.रत्नागिरी येथे टाटा कंपनीचा 10 चाकी डंम्पर क्र.एम.एच.08 अेपी 2764 हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेलेवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुु.र.नं. 73/2023 भा.दं.सं.क.379 हा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक साो.रत्नागिरी यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाद्वारे समांतर तपास चालू होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्था.गु.अ.शा. पथकाने कौशल्याने अहोरात्र मेहनत घेवून सदर गुन्हयातील आरोपीत इसम नामे लक्ष्मण उर्फ बाळु नामदेव चवरे वय 22 रा. चवरे वस्ती पेनुर, ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर यास दिनांक 22-05-2023 रोजी गाणगापूर ता. अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक येथून अटक केलेले आहे.

आरोपीत याचे ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेला डंम्पर, गुन्हा करणेकामी वापरण्यात आलेली कार व इतर साहीत्य असा एकूण 28, 63,200/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच आरोपी लक्ष्मण उर्फ बाळु नामदेव चवरे वय 22 रा. चवरे वस्ती पेनुर, ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा करण्यासाठी

1) गणेश अरुण पाटील, 2) समाधान शिवाजी चवरे दोन्ही रा. पेनुर ता. मोहळ, जि. सोलापूर हे सोबत असल्याची माहीती दिलेली आहे. सदरचे दोन्ही इसम हे सहाईत गुन्हेगार आहेत.

आरोपी व सदर गुन्हयाकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरीता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेला आहे

 

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी तपास पथकामधील खालील नमुद पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

1. सपोफौ/751 संजय कांबळे,

2. पोहेकॉ/251 शांताराम झोरे,

3. पोहेकॉ/909 विजय आंबेकर,

4. पोहेकॉ/265 योगेश नार्वेकर व

5. पोकॉ/215 अतुल कांबळे.