इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१८ : जी.पी पारसिक सहकारी बँक लिमिटेड कळवा -ठाणे बँकेचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. गोपीनाथ शिवराम पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्लस्टर ४ तर्फे इचलकरंजी शाहू पुतळा येथे महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. सदरचे महारक्तदान शिबिर विद्यमान अध्यक्ष विक्रम गोपीनाथ पाटील व उपाध्यक्षप्रकाश नकुल पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या प्रेरणेने आयोजित केले होते.
सदर चे रक्तदान शिबिर आधार ब्लड बँक इचलकरंजी यांचे मार्फत घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन क्लस्टर हेड महेश पाटील अन्वेष बांदे तसेच संभाजी पाटील, अरुण पाटील, श्रीकांत पाटील, बाहुबली पाटील, राजेंद्र खोत, प्रज्योत ऐतोडे तसेच सौ. उज्वला मधाळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच महारक्तदान शिबिरासभरघोस प्रतिसाद मिळाल्याने १७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान दात्याला बँकेच्या कडून भेट म्हणून टी -शर्ट देण्यात आले .
यावेळी क्लस्टर ४ चे रोशन पाटील, चिराग मोकाशी, विलास यादव, दिपक किल्लेदार, विश्वजीत दाभोळे, विनय हरोळीकर, सौरभ गारे, सुरज नेजे, सचिन बरगे व कोमल हडपद, राम कोरवी, सुशांत मगदूम, वैशाली सूतार, प्रकाश गावडे, तुषार पवार, अमीत घाडगे, प्रमोद कदम, महेश उगलमुगले व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते. शेवटी जी. पी. पारसीक बँकेच्या वतीने रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.