‘दिलखुलास’ कार्यक्रमात ग्रंथोत्सव या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत
मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘ग्रंथोत्सव’ या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने राज्यात ग्रंथोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे जिल्हास्तरावर कशाप्रकारे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येते. तसेच या ग्रंथोत्सवातून वाचकांना कोणकोणती ग्रंथसंपदा उपलब्ध होणार आहे याबाबतची माहिती ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमातून जाणून घेतली आहे. ही मुलाखत सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी घेतली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.