श्री दत्त शेतकरी सभासदांचा गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास
धरणगुत्ती, हरोली, जांभळी, टाकवडे, कोंडीग्रे यड्राव, शिरढोण, हेरवाड, घोसरवाड आणि शिरोळात संवाद दौरा
शिरोळ:सलीम माणगावे
दि .१४ :श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ गटाने आज धरणगुत्ती, हरोली, जांभळी, टाकवडे, कोंडीग्रे, यड्राव, शिरढोण, हेरवाड, घोसरवाड आणि शिरोळ आदी भागात संवाद दौरा केला. या दौऱ्यामध्ये शेतकरी सभासदांनी सत्तारूढ गटावर आणि उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
धरणगुत्ती येथे सरपंच श्रीमती विजया कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. पांडुरंग रजपूत यांनी स्वागत केले. अरविंद धरणगुत्तीकर, दत्तचे संचालक शेखर पाटील, अशोक निर्मळ, संजय गुरव आणि राजेंद्र प्रधान यांनी मनोगतामधून श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आणि योजनांची माहिती देऊन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सक्षमपणे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे काम करीत असल्याचे सांगितले. रघुनाथ म्हेत्रे, महेश परीट, सुरेश आरगे, मनोहर माळी, मलगोंडा पाटील, आप्पासो पाटील, अशोक पाटील, काकासो पाटील, भालचंद्र लंगरे, संभाजी भानुसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरोली येथे शामराव कदम, पांडुरंग रजपूत, श्रेणिक नरदे, राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले. गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, सुपर केन नर्सरी, दोनशे टनाचे उद्दिष्ट, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, शेतकरी, कामगार, सप्लायर, कॉन्ट्रॅक्टर यांचे वेळेवर होणारे पगार आणि बिले, दत्त भांडार, झुणका भाकर, श्री दत्त हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, रोपवाटिका, कुस्ती केंद्र, वाचनालय यांच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. त्याच पद्धतीने क्षारपड जमीन सुधारणा, त्यामुळे वाढलेले उसाचे उत्पादन आणि विस्तारीकरण, शेअर्स आदी संदर्भातही शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी आण्णासाहेब चौगुले, बाळासो कदम, काशिनाथ माने, तुषार गुजरे, महावीर कुडचे, श्रीकांत कदम, वसंत कदम, रामचंद्र माने, दिनकर कदम, कृष्णा माळी, आप्पा चव्हाण, अरुण कदम, रमजान मुजावर, पिंटू झोले, सदाशिव जाधव यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते. सर्वांनी सत्तारूढ गटाला एकमुखी पाठिंबा जाहीर केला.
टाकवडे येथे भीमगोंडा चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा घेण्यात आला. यावेळी धोंडीलाल शिरगावे, अमोल चौगुले, रोहित पाटील, दिनकर गुरव, आबासो पाटील, राजगोंडा पाटील, प्रतीक उर्फ बंटी पाटील, सुरेश पाटील, हुसेन शेख, सरपंच श्रीमती सविता चौगुले, श्रीमती सुप्रिया हरणे, विक्रम घोरपडे, ऍड. सर्जेराव घोरपडे आदी मान्यवर तसेच सभासद उपस्थित होते.
हेरवाड येथे रेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. दामोदर सुतार गुरुजी यांनी श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासद हितांच्या सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन गणपतराव पाटील यांच्या पाठीशी हेरवाड सभासद ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला. दयानंद पाटील, दिलीप पाटील, वैभव पाटील, सुकुमार पाटील, सुरगोंडा पाटील, निगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, हयातचंद जमादार, बाळासो माळी, लखाप्पा अकिवाटे, चंद्रकला पाटील, स्नेहा देसाई, वसंतराव देसाई आदी उपस्थित होते.
शिरढोण येथे शिवमुर्ती चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी अविनाश चौगुले, सुरेश सासणे, विकास कांबळे, विश्वास बालीघाटे, सरपंच बाबासो हेरवाडे, महादेव पाणदारे, मनोहर शिरसे, तानाजी कोळी, हुसेन अपराध आदी सभासद शेतकरी उपस्थित होते.
घोसरवाड येथे सरपंच साहेबराव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद बैठक झाली. यावेळी विजित शिंदे सरकार, मयूर खोत, सुरेश चौगुले, सिद्राम शिंदे, जैनुल मुल्ला, पिराप्पा चौगुले, बाळगोंडा पाटील, सोनल मगदूम, अण्णासो पाटील, अशोक शिंदे, प्रवीण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जांभळी येथे आण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सरपंच सौ. अरुणा कोळी, दिलीप पाटील, के. आर. चव्हाण, हसन देसाई, सुनील राऊत, बाबगोंडा पाटील, भाग्यश्री कांबळे, अनुजा कोळी, सहदेव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.