लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने गोरगरीब नागरिकांना दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्नधान्य वाटप

इचलकरंजी: विजय मकोटे

       दि:12:- लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने गोरगरीब नागरिकांना दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्नधान्य वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे डिट्रिक्ट गर्व्हनर ला. सुनिल सुतार, ला. गहिनीनाथ कदम ला. अक्षय बंडेवार, ला.डॉ.विलासभाई शहा , ला. विजयकुमार राठी, ला. महेश सारडा व अध्यक्ष ला. लक्ष्मीकांत भट्टड प्रोजेक्ट कमिटी चेअरमन ला. स्वाती राठी यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम पार पडला.

प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्तविक ला. विजयकुमार राठी यांनी केले. व या संकल्पनेची माहिती दिली. गेल्या आठ वर्षापासून हे सेवाकार्य चालू असलेचे सांगितले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे ला. सुनिल सुतार यांचेसह सर्व मान्यवरांनी या सेवाकार्याचे कौतुक केले. यासर्व मान्यवरांच्या हस्ते सुमारे १७५ गोरगरीब गरजू कुटुंबांना दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्नधान्यचे किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ला. विनय महाजन, ला. ब्रिजमोहन मर्दा, ला. सुरेश दुबे, ला.सुरेश पाटील, ला. लिंगराज कित्तुरे, ला. गजानन होगाडे, ला. द्वारकादास बोहरा, ला. संगीता सारडा, ला. महादेवी कित्तुरे, ला. संदीप सुतार, ला. अरुण पाटील, ला.कृष्णा भराडिया ला. भरत भंडारी, ला. कनकश्री भट्टड, ला. श्रुतिका भंडारी, ला. लक्ष्मीकांत बांगड, ला. कैलाशचंद्र जोशी ट्रेझरर महेंद्र बालर, सेक्रेटरी ला. शैलेंद्र जैन यांचेसह लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.