पालकांनी मुलांना खेळापासून वंचित ठेवू नये
डॉ. चंद्रशेखर साखरे यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:. विजय मकोटे
दि. १३ आत्मसंरक्षण करायला शिकणे ही एक कला आहे. शरीराबरोबर मनाला चांगल्या विचारांची दिशा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलांना खेळापासून वंचित ठेवू नकात, असे आवाहन करत शिस्तबद्ध वर्तन आणि पालकांसह वरिष्ठांचा आदर करण्याची सवय लावण्याचे कार्य इचलकरंजी अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमी प्रामाणिकपणे करत आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले.इचलकरंजी अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सौजन्याने विक्रमी 21 खेळाडूंना ‘ब्लॅक बेल्ट उच्च पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा’ कार्यक्रमप्रसंगी डॉ. साखरे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी होत्या. तर उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष प्रकाश रावळ व सेक्रेटरी संजय घायतिडक आदि प्रमुख उपस्थित होते.
ग्रॅण्डमास्टर रविकिरण चौगुले यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात कारकीर्दीतील ठळक स्मृतींना उजाळा देत लॉकडाऊनमध्येही खेळाडूंचा मार्शल आर्टचा सराव घेतल्याचे सांगितले. संस्थेला ‘सेंच्युरी क्लब ऑफ ब्लॅक बेल्ट विनर्स अकॅडमी’चा बहुमान आणि जुन्या खेळाडूंच्या नव्या पिढीला प्रशिक्षण देण्याचा योग लाभल्याचे सांगितले. यानंतर खेळाडूंनी मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
जिल्हाधिकारी डॉ. साखरे यांच्या हस्ते कु. राधिका पवनकुमार मंत्री, कु. नयना प्रफुल बलदवा, कु. साची विजय शिखरे, शौर्य बाळासो शिरगावे, विशाल विवेक अग्रवाल, चिराग अभय बाबेल, सर्वेश राजेश बांगड, जय विवेक पांड्ये, विवेक सुरेश अग्रवाल, कु. श्रेया सूरज केसवानी, कु. दिवा सागर गांधी, कु. प्राजू चंद्रशेखर बिरादार, कु. अनुष्का अमोल दरीबे, मंजूनाथ चंद्रशेखर बिरादार, प्रज्वल विजयकुमार कांबळे, कु. राजवी पवन बलदवा, चैतन्य प्रफुल बलदवा, चिराग पवन बलदवा, कु. काव्या नितेश पाटणी, कु. महेक सूरज केसवानी, कु. याश्ना अभिषेक बजोरिया आदि खेळाडूंना ‘ब्लॅक बेल्ट पदवी प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले.
प्रकाश रावळ यांनी आभार मानले. सौ. अलका रावळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रमुख प्रशिक्षिका सौ. किरण चौगुले, ब्लॅक बेेल्ट प्रशिक्षक रोहित सुतार, सचिन जाधव, बाळासाहेब माने, रिया चौगुले, सर्वेश हजारे, श्रेया चौगुले, व्यंकटेश जुगळे, कुबेर मुरगुंडे, सौ. नम्रता दड्डी (गडहिंग्लज) आदींसह खेळाडू आणि पालक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.