न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी ५२व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली : प्रतिनिधी 

दि १४  : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारंभात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.या समारोहाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीउपराष्ट्रपती जगदीप धनखडलोकसभा अध्यक्ष ओम बिर्लागृहमंत्री अमित शाहसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवालसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्नासर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशवरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कायदा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाल १३  मे २०२५  रोजी संपल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी हे पद आज त्यांच्याकडून स्वीकारले.

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म २४  नोव्हेंबर १९६०. रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. आंबेडकरवादी नेतेमाजी खासदार आणि विविध  राज्यांचे राज्यपाल राहिलेले रा.सु. गवई यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा असून ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. न्यायमूर्ती गवई यांनी १९८५ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. एल.एल.बी. पूर्ण करून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. १९८७ मध्ये त्यांनी मुंबई येथे उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केलीप्रामुख्याने नागपूर खंडपीठात. १९९२-९३ मध्ये त्यांनी सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोजक म्हणून कार्य केले.२००३ मध्ये त्यांची उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २०२५ पासून ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. २४  मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीशपदासाठी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठेतेनुसार झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २९ एप्रिल २०२५  न्यायमूर्ती गवई यांनी ७०० हून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला असून ३०० हून अधिक निर्णयांचे लेखन केले आहे. ज्यामध्ये संविधानिकप्रशासकीयनागरीफौजदारी आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.