गोकुळ’ परिवारातर्फे उल्लेखनिय कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
दि.१८. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गोकुळ तर्फे सत्कार करण्यात आला.
यामध्ये आनंद अशोक पाटील रा. दारवाड, ता.भुदरगड यूपीएससी परीक्षेत देशांमध्ये ३२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत ते ग्रामीण भागातील असून त्यांना वयाच्या ३ वर्षी झालेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमुळे दुर्दैवाने दृष्टी अल्प झाली.या शारिरीक अडचणीवर मात करीत त्यांनी मनाशी ध्येय बाळगून त्यांनी आय.ए.एस होण्याचे स्वप्न पहिले व त्यांनी ते स्वप्न पूर्ण केले यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हाणाले की आनंद कोल्हापूर जिल्ह्याचे सुपूञ आहेत याचा आम्हाला अभिमान आहे व संकेत संतोष तायशेटे रा. राधानगरी ता. राधानगरी, यांची सिंगापूर येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाले बद्दल, कु. विदया तानाजी मगदूम रा. चुये, ता.करवीर, हिची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाले बद्दल व संघ सेवानिवृत्त झालेले तावरेवाडी सेंटरचे वॉचमन शिवाजी विठोबा जगदाळे या सर्वांचा सत्कार संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित सत्कार करण्यात आला व खेळाडूना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..
याप्रसंगी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.