डिकेटीईमध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी सर्जिकल गाऊनची निर्मिती

इचलकरंजी: मनोज खेतमर
                      दि २१ डिकेटीई मधील अंतिम वर्ष टेक्स्टाईलच्या अभिजित जगदाळे, अजित नलवडे, रुषिकेश नाईक, श्‍वेता महंता या विद्यार्थ्यांनी प्रा.राजन्ना गोटीपामूल यांच्या मार्गदर्शनाखाली नॉनओवन कापडाचा उपयोग करुन सर्जिकल गाऊनची निर्मिती केली.  या कापडाचे वैशिष्ठय म्हणजे हे अँटीवायरल असून ब्लडरिपेलंट देखील आहे. हे कापड वैद्यकीय क्षेत्रासाठी विशेषतः जे सर्जरीमध्ये सहभागी असतात अशा डॉक्टर व त्यांचे सहकारी यांना वरदान ठरणारे आहे.  
कोविड-१९ या साथीच्या रोगाने थैमान घातलेले असताना अँटीवायरल कापड निर्मिती ही जणू काही मूलमंत्रच बनला आहे.  विशेषतः वैद्यकीय वस्त्रोद्योगामध्ये या गुणधर्माचा वापर झपाटयाने वाढत आहे.  कोविड-१९ च्या काळात फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर तसेच हॉस्पीटल मधील सर्व स्टाफला व्हायरसपासून बाधित होण्यापासून वाचविण्यासाठी पूर्ण बॉडी कव्हर करणारे पिपीई कीट, मास्क निर्मितीसाठी या अँटीवायरल कापडाचा अतिशय महत्वपूर्ण उपयोग होतो.
या प्रोजेक्ट मध्ये वैशिष्ठयपूर्ण अशा तीन लेअरवाले कापड व फंक्शनल फिनिशचा वापर करुन अशा नाविण्यपूर्ण नॉनओवन कापडाची निर्मिती केली की जे अँटीवायरल तर आहेच त्याचबरोबर ब्लडरिपेलंट देखील आहे. कापड निर्मिती करत असताना कापडाच्या कंफर्ट किंवा इतर गुणधर्मामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, प्रा. डॉ. एम.वाय गुडियावर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.