भांडवली बाजारातील ‘ बॉण्ड’च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग
मुंबई: प्रतिनिधी
दि.९: Nashik Municipal Corporationच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग National Stock Exchange of India येथे ‘रिंगिंग बेल’ वाजवून Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी Girish Mahajan, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, NSE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महापालिकांनी भांडवली बाजारातून बॉण्ड जारी करून विकास कामांसाठी निधी उभारावा. केंद्र शासनानेही यासाठी योजना जाहीर केली असून बॉण्डची मर्यादा २०० कोटींवरून १,००० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निधीतून नाशिकमध्ये पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येणार असून पाण्याची गळती ४७ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर क्षेत्रात सुमारे २५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून त्यामुळे नाशिक हे भविष्यात गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
बॉण्डच्या निधीतून होणारी विकास कामे
बॉण्डमधून उभारलेला निधीचा वापर विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी होणार आहे. यामध्ये मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे क्षमता वाढविणे, विल्होळी येथे नविन जलशुद्धीकरण केंद्र, विल्होळी नवीन जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यत मुख्य गुरुत्व वाहिनी टाकणे आदींचा समावेश आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कुंभमेळ्याच्या काळात तसेच त्यानंतरही नाशिक शहराला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.