हिराराम हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी उत्साहात

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि .१०: येथील हिराराम हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराराम हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. सपकाळ होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून अशोक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. संगीता पाटील उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सौ. संगीता पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या शिक्षणाची ज्ञानज्योती पेटवणाऱ्या कर्तबगार महिला होत्या, असे सांगितले. स्त्रियांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या विचारांमधून समाजाला योग्य दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस. एस. सपकाळ यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. समाजाच्या प्रगतीसाठी मुलींचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. ए. पी. पाटील यांनी केले.या कार्यक्रमामुळे शाळेत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.