संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड


या निवड प्रक्रियेसाठी टाटा मोटर्सचे प्रतिनिधी ओम काकड, प्रताप गायकवाड तसेच केआयएम एल कंपनीचे सुहास भावरी, महादेव माने आणि सुशील सावंत उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आशिष पाटील आणि आयटीआय विभागाचे अविनाश पाटील यांनी आपल्या टीमसह विशेष परिश्रम घेतले. तसेच विभागप्रमुख नितीन पाटील, रईसा मुल्ला आणि प्रशांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट जोडून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून त्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा ठरला आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुजित मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रथमेश गोंधळी यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.