डीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.५ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूटच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यानी विविध राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा, हॅकॅथॉन व तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखन्नीय यश संपादन मिळवले आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अध्यापनासोबत संशोधन व उद्योजकता विकासावर दिला जाणारा भर तसेच डीकेटीईच्या आयआयसी, स्टार्टअप आणि युक्ती सेल अंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या संशोधनात्मक वृत्तीमुळे डीकेटीईच्या सिव्हील विभागाच्या प्रकल्प सादरीकरणांमध्ये विविध स्तरावर आपला डंका वाजविला आहे.
सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुध्दिमता (ए.आय.),इलेक्ट्रॉनिक्स व सॉफटवेअरचा प्रभावी वापर करुन बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक प्रणाली, नागरी सुरक्षितता व सुविधा, रस्त्यावरील सारण गटारी, कृषी क्षेत्र, स्मार्ट पार्किंग ते अंतराळ संशोधनपर्यंत विविध अभिनव प्रकल्प विकसित केले आहेत. या प्रकल्पांच्या जोरावर गेल्या वर्षभरात १२ हून अधिक पारितोषिके पटकावत उल्लेखन्नीय कामगिरी नोंदवली असून, त्यामध्ये ६ प्रथम क्रमाकांचा विशेष गौरव समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण वासवी कॉलेज – तेलगंणा, वॉलचंद कॉलेज -सांगली, संत गजानन महाराज कॉलेज – महागाव, डॉ जे.जे. मगदूम कॉलेज -जयसिंगपूर, तात्यासाहेब कोरे इंजिनिअरींग इन्स्टिटयूट – वारणानगर, अशोकराव माने इंजिनिअरींग कॉलेज – वाठार यासारख्या कॉलेजमध्ये आपली गुणवत्ता अधोरेखीत केली. याशिवाय द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा एकूण ६ पारितोषिकांची भर घातली आहे.
डीकेटीईच्या आयडीया लॅबमधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळत असून, जागतिक घडामोडींशी सुसंगत समाजोपयोगी उपाय विकसित करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या प्रात्यक्षिकाधारित, संशोधनकेंद्रित शिक्षणपध्दतीमुळे विद्यार्थ्यांची नवोन्मेष क्षमता वृध्दिंगत होत असून ते राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत, असा विश्वास संस्थेच्या संचालिका डॉ सौ. एल. एस. आडमुठे यांनी व्यक्त केला.डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ.एस.के.पाटील व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.