कडवई येथील श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात;

ऐतिहासिक 'सतीशिळा स्मारका'चे उद्घाटन

कडवई : दिपक तुळसणकर 
दि. १८ मे २०२६::    रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील  श्री. वरदान देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन १८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या मंगलमयी दिनानिमित्त सत्यनारायण महापूजेसह मंदिर परिसरात महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक ‘सतीशिळा स्मारका’चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाले.


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता महाअभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सतीशिळा स्मारकाचे उद्घाटन सोहळा पार पडला.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे जिल्हा परिषद सदस्य सौ. विशाखाताई कुवळेकर , कडवई प्रशासक श्री. दत्ताराम ओकटे, ग्रामविकास अधिकारी श्री. राहुल कुमार चौधरी, पंचायत समिती सदस्या अपर्णाताई जाधव, माजी आमदार सुभाष बने  माजी सभापती सहदेव बेटकर , कृष्णाजी हरेकर , माजी सरपंच वसंतजी उजगावकर, वरदान देवी ट्रस्टचे पदाधिकारी आणि गावकर दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी दुधाने  आदी मान्यवर उपस्थित होते.


उद्घाटनानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. रात्री ८ ते ९ या वेळेत श्री विश्वकर्मा भजन मंडळ, सुतारवाडी (कडवई) यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. या धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.