शरद इन्स्टिट्युटच्या १० विद्यार्थ्यांची टेकफिनिक्स कंपनीत निवड

यड्राव: राम आवळे

दि.२५: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची टेकफिनिक्स प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.

मेकॅनिकल विभागातील वैभव झडगे, आसावरी माने, निलेश कोरे, स्वरुपा मगदूम, केदार कुलकर्णी, ओमकार सातपुते, अनिरुध्द परीट, अरमानअल्ली फनिबंद, सिव्हिल विभागातील अभिषेक धनवडे, मयुरेश पाटील ह्या विद्यार्थ्यांची निवड झाली.ही एक अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी मुख्यतः ऑईल अँड गॅस, पेट्रोकेमिकल, फार्मास्युटिकल, फर्टिलायझर, पॉवर जनरेशन आणि वॉटर इंडस्ट्रीसाठी इंजिनिअरिंग डिझाईन व कन्सल्टन्सी सेवा पुरवते. मुंबई येथे मुख्यालय असून देश व विदेशात सेवा पुरविते.

     महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अंतर्गत ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव, पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंट, इंटरपर्सनल स्किल्स, मॉक इंटरव्हयु यांची तयारी करुन घेतली जाते. तसेच कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्यूसाठी झाला.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलच्या प्रा. नेहा प्रसुन, प्लेसमेंट डिन प्रा. ए.बी. जाधव, डॉ. विद्या पाटील, प्रा. प्रियाका कबाडे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.