अवैध IPL बेटिंग प्रकरणातील दोन मास्टरमाईंड गुजरातमधून जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; आतापर्यंत ८७,५५, २३०/- लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 
दि.११: इचलकरंजीतील अवैध आयपीएल बेटिंग रॅकेट प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्यातील दोन मास्टरमाईंड आरोपींना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११२ तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         २४ मे २०२६ रोजी सायंकाळी भुवनेश्वरी मंदिरासमोरील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील अमेय बडवे  यांच्या मनीषा एंटरप्रायझेस या फुटवेअर गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या अवैध आयपीएल बेटिंग अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान यापूर्वी ९ आरोपींना अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान या अवैध बेटिंग व्यवसायामागील दोन प्रमुख सूत्रधार गुजरातमधील सुरत येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार विशेष तपास पथकाने सुरत येथे जाऊन जयदीप रमेशभाई चिकारा (वय ३०)हार्दिक रमेशभाई चिकारा (वय ३२) या दोघांना अटक केली.

अटक आरोपींकडून ६२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, दोन टॅब, दोन लॅपटॉप आणि एक सीपीयू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ८७ लाख ५५ हजार २३० रुपये इतकी झाली आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. निलोत्पल साो, मा. अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग, कॅम्प-इचलकरंजी श्री. आण्णासाहेब जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग, इचलकरंजी श्री. विक्रांत गायकवाड साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. विकास शिंदे हुपरी पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. महावीर कुटे, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण साने, पो.हे.कॉ १४२६ प्रमोद भांगरे, पो.कॉ .१३९० रणवीर जाधव, पो.कॉ .२५३७ नितीन जाधव, पो.कॉ .१८२९ नितीन पाटील, पो.कॉ. २३८५ अमोल अवघडे, पो.कॉ .१९८७  सद्दाम सनदी.तसेच विशेष तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पोलीसांकडून अटक आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून या अवैध बेटिंग रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.