स्वर्गीय सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची पुण्यतिथी साजरी
कबनूर : हबीब शेख दर्जी
दि.५ जुलै २०२६ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा स्वर्गीय सौ.सरोज मणेरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शितलकुमार मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.अनिलकुमार मणेरे, संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे हे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा स्वर्गीय सौ.सरोज मणेरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे यांनी स्वर्गीय सौ. सरोज मणेरे काकींच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वर्गीय सौ.सरोज मणेरे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ.राजश्री चव्हाण तर आभार सौ.लिना कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, कॉलेज विभागप्रमुख सौ.दिपाली चौगुले, अकॅडमी विभागप्रमुख श्री.शैलेश कांबळे, बालवाडी विभागप्रमुख सौ.स्वाती ढेकळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.