लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी प्रथमेश गायकवाड; पदग्रहण सोहळा उत्साहात

रत्नागिरी: नियाझ खान 

दि. ५ : मराठा भवन येथे लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लायन प्रथमेश गायकवाड यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.सोहळ्यास इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून पीडीजी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित उपस्थित होते. तसेच झोन चेअरमन एमजेएफ लायन शिल्पा पानवलकर आणि डिस्ट्रिक्ट अॅक्टिव्हिटी चेअरमन एमजेएफ लायन पराग पानवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

            यावेळी मार्गदर्शन करताना झोन चेअरमन लायन शिल्पा पानवलकर यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी सर्व क्लबांनी एकत्रितपणे विविध उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. सामूहिक सेवाकार्यामुळे समाजहिताबरोबरच सदस्यांमधील स्नेहसंबंध अधिक दृढ होतील, असे त्यांनी सांगितले.

           नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी लायन प्रथमेश गायकवाड, सचिवपदी लायन भक्ती प्रथमेश गायकवाड, खजिनदारपदी लायन अभिजित पंडित आणि प्रथम उपाध्यक्षपदी लायन धनश्री धनंजय पालांडे यांनी पदाची शपथ घेतली.

              याशिवाय द्वितीय उपाध्यक्षपदी लायन प्रदीप मोरे, टेमर म्हणून लायन दर्शन पवार, सहसचिव म्हणून लायन अमित पटेल, टेल ट्विस्टर म्हणून लायन वैभव पाटील, जीएसटी चेअरमन म्हणून लायन हितेंद्र पटेल, जीएमटी चेअरमन म्हणून लायन श्रीकांत पाटील, जीएलटी चेअरमन म्हणून लायन ओंकार पाटील, मार्केटिंग व कम्युनिकेशन प्रमुख म्हणून लायन निलेश पटेल तसेच चेअरपर्सन म्हणून लायन महेश पटेल, लायन जान्हवी द. पवार, लायन वसंत पटेल आणि लायन हितेश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.

                 कार्यक्रमाला क्लबचे बीओडी सदस्य लायन प्रविण मलुष्टे, एमजेएफ लायन नितीन कुलकर्णी, लायन रश्मी प्रविण मलुष्टे, लायन जयंत जोशी, लायन जयश्री जोशी आणि लायन सूर्यकांत जाधव उपस्थित होते. यावेळी साईप्रसाद खोत आणि तुषार सावंत यांचे नवीन सदस्य म्हणून स्वागत करून त्यांना क्लबचे पिन प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन धनश्री पालांडे यांनी केले. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.