नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश

मोहनीश भोसले 10 वा तर सार्थक पाटील 14 वा

कोल्हापूर :सलीम मुल्ला 

दि.१९ जुलै २०२६ : जय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट २०२६ मध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये मोहनीश भोसले ७०५ /७२० गुणांसह ऑल इंडिया रँक (AIR) १० वा, तर सार्थक पाटील ७०५/७२०  गुणांसह १४ वा रँक मिळवून राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले.याबरोबरच साहिम पाटवेगार यांनी ६९०/७२०  गुणांसह (AIR )१०६ , श्रीवल्लभ गावडे यांनी ६९०/७२०  गुणांसह (AIR )१२२ , तर समीर जाधव यांनी ६८५/७२०  गुणांसह (AIR )१७७  मिळवत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.

याशिवाय मोहनीश भोसले, सार्थक पाटील, सहीम पटवेगार आणि समीर जाधव यांनी जीवशास्त्र (Biology) विषयात ३६०  पैकी ३६०  गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेचे अनुभवी शिक्षक, नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठीची प्रभावी तयारी यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थेने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक श्री. वासू, केंद्रप्रमुख श्री. गुप्ता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.