डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २०जुलै २०२६: डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग संस्थेच्या १४ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये निवड झाली आहे. रु. ७.२ लाख ते ४.५ लाख वार्षिक वेतन पॅकेज मिळवत विद्यार्थ्यांनी उल्लेखन्नीय यश संपादन केले आहे. या निवडीमुळे डीकेटीईने नामांकित आय.टी. कंपन्यामधील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिध्द केली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही टाटा समूहाची जागतिक स्तरावरील अग्रगण्य आयटी सेवा, डिजीटल सोल्युशन्स आणि कन्सल्टिंग कंपनी असून, ५५ हून अधिक देशांमध्ये तिचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. जगातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित तंत्रज्ञान कंपन्यापैकी टीसीएसचा समावेश होतो.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील झालेल्या टीसीएस निंजा-डिजीटल प्लेसमेंट प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली आणि फायनल इंटरव्हयू मधून डीकेटीई संस्थेच्या १४ विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत टीसीएसमध्ये स्थान मिळविले.विद्यार्थ्यांच्या यमागे संस्थेची उद्योगाभिमुख शिक्षणपध्दती, नियोजनबध्द प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्वाचे ठरले. प्रत्येक विभागामध्ये अॅप्टीटयूड टेस्ट, तांत्रिक मुलाखाती, कोडिंग, ग्रुप डिस्कशन, सॉफट स्किल तसेच मॉक इंटरव्हयूवचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या सर्वसमावेशक तयारीमुळे विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यात उल्लेखन्नीय यश मिळविले.
निवड झालेले विद्यार्थीः कॉम्प्युटर विभागामधूनः अजिंक्य बोंडगे, साहिल मालवी, साक्षी पाटील, सुदेश कुंभार, मंथन घोरपडे, माज भडगांवकर, सानिका मिरजे एआयएमएल विभागातूनः विजय खापरे, वैदही वजे, अनुष्का करडे, श्रेयश मालानी, रविना रावूल इटीसी विभागामधून ः प्रज्ञा उपाध्ये एआयडाटा सायन्स विभागामधून ः सोहल ढवळे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.के.शिरगावे, डॉ. डी.व्ही. कोदवडे, डॉ सौ जे.पी. खरात, डॉ टी.आय.बागबान, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी त्याचबरोबर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.