क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
दि.२१: राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डाॅ. जस्मिन यांनी पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जस्मिन, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, जि.प.सदस्या सानिका आवाडे, साै. वर्षा सावर्डेकर, गटविकास अधिकारी शबाना, माेकाशी, बाबासाे चाैगुले, डी. सी. पाटील, सुधीर पाटील, गाेगा बाणदार, धनंजय टारे आदींनी दाेन्ही तीर्थ क्षेत्रांना भेटी देऊन तीर्थ क्षेत्र याेजना अंतर्गत करावयाच्या विविध विकासकामांची पाहणी केली. भेटीदरम्यान सीईओ डाॅ. जस्मिन यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.