अजितदादा पवार जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात महिलांना उद्योग व स्वावलंबनासाठी शासकीय योजनांची माहिती

इचलकरंजी: विजय धुत्रे 
दि.२८ जुलै २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (इचलकरंजी) यांच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसेवा सप्ताह’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. बिलकिस मुजावर होत्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक राहुल गोरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रारंभी आसमा लाटकर यांनी स्वागत केले. तौफिक मुजावर यांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख, इस्माईल समडोळे आणि राहुल गोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राबिया मुजावर यांचा सत्कार बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

         यावेळी राहुल गोरे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, उद्योग उभारणीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, तसेच लघुउद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांची सविस्तर माहिती दिली. महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे येऊन स्वावलंबी होण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बाळासाहेब देशमुख यांनी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना उद्योजिका म्हणून घडविण्याच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

        याप्रसंगी शहाजहान टक्कळकी, आदिल कमालशाह, सरिता देशमुख, रियाना पठाण, अफरीन पकाली, समीरा गोरवाडे, हसीना सय्यद, लक्ष्मी बुरले, तमन्ना मुजावर, मेहबूब पठाण, सरफराज मुजावर, सलीम लाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक मुल्ला यांनी केले. या उपक्रमास दोनशेहून अधिक महिलांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.