भारत सरकारच्या 5G लॅब उपक्रमात देशातील १०० संस्थामध्ये डीकेटीईचा राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक

इचलकरंजी: विजय धुत्रे 

दि.२८  जुलै २०२६ : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटने आणखी एक ऐतिहासिक राष्ट्रीय यश संपादन करत देशातील सर्वोच्च  5G युझ केस लॅब प्रदान केलेल्या १०० संस्थामध्ये ओव्हरऑल एक्सलन्स व  5G लॅबच्या आउटपूट व इम्पॅक्ट एक्सलन्स या दोन्ही गटात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने देशभरातील निवडक १०० अग्रगण्य संस्थामध्ये स्थापन केलेल्या  5G युझ केस लॅबच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना डीकेटीईने ही उल्लेखन्नीय कामगिरी नोंदविली. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व राज्यमंत्री डॉ चंद्रशेखर पेम्मासानी यांचे हस्ते झाले यावेळी आनंद खरे, डायरेक्टर जनरल ऑफ टेलिकॉम, राधेश्याम परमार, डीडीजी महाराष्ट्र एलएसए यांची प्रमुख उपस्थिती होती. डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेल्युकम्युनिकेशन विभागास भारत सरकारच्या दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय यांच्यामार्फत ’ 5G लॅब‘ सेटअप चे अनावरण देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले होते.
विशेष म्हणजे या  5G राष्ट्रीय पुरस्कार मूल्यमापनात आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, केंद्रीय विद्यापीठे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच देशातील इतर अभियांत्रिकी संस्थाचा समावेश होता. अशा संस्थामध्ये डीकेटीईने दोन विभागामध्ये देशामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत संशोधन, नवोपक्रम, उद्योग, सहकार्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास, बौध्दिक संपदा निर्मिती आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकरणातील आपले नेतृत्व अधोरेखित केले आहे. या लॅबमुळेे शेतीविषयक, वस्त्रोद्योग, शैक्षणिक, आरोग्य, वाहतूक, ए.आय., आयओटी इ. क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व संशोधन वृत्ती वाढीस चालना मिळाली आहे.
भारत  5G युझ केस लॅबचे मूल्यमापन विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग, संशोधन प्रकल्प, स्टार्टअप व एमएसएमई सहभाग, उद्योग सहकार्य, संस्थात्मक भागिदारी, तंत्रज्ञान योगदान, उत्पादन विकास, बौध्दिक संपदा निर्मिती आणि नवोपक्रमांंच्या व्यावसायिकीकरणासह ११ महत्वपूर्ण निकषांवर केले. या सर्व निकषांमध्ये डीकेटीईने उल्लेखन्नीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.  5G आणि उदयोन्मुख  6G तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम, उद्योग-अभ्यासक सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासासाठी डीकेटीईने उभारलेल्या सक्षम परिसंस्थेची ही राष्ट्रीय स्तरावर झालेली अधिकृत दखल असल्याचे मानले जात आहे.
सदर पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व विश्‍वस्त संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस.आडमुठे डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, इटिसी विभागप्रमुख प्रा.डॉ.जे.पी.खरात यांचे मार्गदर्शन लाभले तर या  5G लॅबसाठी प्रा.डॉ.ए.आर.पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची चौकट – देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांच्या स्पर्धेत मिळविलेला हा राष्ट्रीय सन्मान डीकेटीईच्या संशोधन केंद्रित, उद्योगाभिमुख आणि नवोवपक्रमप्रधान शैक्षणिक वाटचालीचा आणखी एक सुवर्ण अध्याय ठरला असून, भविष्यात  5G, 6G आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधनात देशाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने संस्थेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाउल आहे.
फोटो ओळी ः दिल्ली येथे संपन्न झालेल्या  5G लॅब पुरस्कार सोहळयात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व राज्यमंत्री डॉ चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारीत असताना डीकेटीईच्या डॉ.जे.पी.खरात, डॉ ए.डी.काडगे व डॉ एस.आर. प्रसाद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.