शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या ग्रंथालयात ई-मेल अलर्ट सेवा सुरू
यड्राव: कयुम शैख
दि १२ : येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या ग्रंथालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ई-मेल अलर्ट सेवेचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. प्रमोद कणप व प्राध्यापकांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ग्रंथालयात आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाचकांसाठी ई-मेल अलर्ट सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
या सुविधेमुळे ग्रंथालयातील पुस्तकांच्या देवाण-घेवाणीबाबत वाचकांना वेळेवर ई-मेलद्वारे सूचना मिळणार आहेत. त्यामुळे पुस्तकांची मुदत, परतावा तसेच ग्रंथालयाशी संबंधित आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद कणप, उपप्राचार्य डॉ. अमित मासुळे, ग्रंथपाल राहुल लेंजे, सहाय्यक ग्रंथपाल किशोरी गरड यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालयविषयक विचारांना अभिवादन करण्यात आले. ज्ञान, वाचन आणि आधुनिक ग्रंथालय सेवांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.