इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न
खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
इचलकरंजी : विजय मकोटे
दि १६: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाप्रती अभिमानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा रॅली सोमवारी (दि. १७) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती आणि विविध सामाजिक संस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरातील प्रमुख मार्ग देशभक्तीच्या घोषणांनी आणि तिरंग्याने भारावून गेले.रॅलीस खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीस प्रारंभ झाला. हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी देशभक्तीचा संदेश दिला. श्री शिवतीर्थ-श्री शंभुतीर्थ मार्गे रॅली महात्मा गांधी पुतळा येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीमध्ये शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडापटू, विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, NCC व MCC चे विद्यार्थी, युवक-युवती, फिटनेस क्लब, सामाजिक संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तिरंगा हातात घेऊन नागरिकांनी सहभाग नोंदवल्याने शहरातील प्रमुख मार्ग तिरंगामय झाले होते.
‘ हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रध्वजाप्रती आदर आणि देशप्रेमाची भावना दृढ व्हावी तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महानगरपालिकेने या रॅलीचे आयोजन केले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रॅलीला उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरण लाभले.
यावेळी सौ. मोश्मी आवाडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, महिला व बालकल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, समाजकल्याण सभापती रुबन आवळे, प्रभाग समिती सभापती अभिषेक वाळवेकर, नंदकुमार पाटील, सुशांत कलागते, नगरसेवक तानाजी पोवार, नगरसेवक रवी रजपुते, उपसभापती पूनम माळी, नगरसेवक चंद्रकांत शेळके, संतोष शेळके, राजू बोंद्रे, नितेश पोवार, योगेश पाटील, अविनाश कांबळे, नगरसेविका धृवती दळवाई, मनीषा नवनाळे, मनीषा कुपटे, वैशाली पोवार, स्नेहल रावळ, सपना भिसे, मोनाली मांजरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, प्रा. शेखर शहा आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेचे उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहायक संतोष जिरगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.