राजाराम स्टेडियमवर इचलकरंजी महानगरपालिकेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ महापौर उदय धातुंडे यांच्या शुभहस्ते

इचलकरंजी :हबीब शेख दर्जी 

दि.१७: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          ध्वजारोहण समारंभासाठी महानगरपालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तसेच राजर्षी शाहू हायस्कूल, डी.के.ए.एस.सी. महाविद्यालय, आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल, गंगामाई हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूल, मृगेद्र आण्णा सुलतानपुरे विद्यामंदिर, आदर्श विद्यामंदिर, एनसीसी व एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

          यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी शहरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महानगरपालिका सेवेतून यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत इचलकरंजी शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा तसेच माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रमिला सुर्वे, प्रा. विनायक भोई, प्रा. शेखर शहा, प्रा. राहुल बूनांद्रे, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार, प्रा. व्ही. एस. मुलाणी, सरस्वती हायस्कूलचे संजय परिट, जितेंद्र कुलकर्णी, जिनपाल कोठावळे, गणेश बरगाले, प्रा. कृष्णा अडकिल्ला आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

           यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, महिला व बालकल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, नगरसेवक तानाजी पोवार, रवी रजपुते, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक संतोष शेळके, नगरसेविका शशिकला कवडे, प्रियांका इंगवले, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, विद्या कदम, वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, सहायक आयुक्त रोशनी गोडे, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार, सहायक आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, माजी सहायक आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता बाजीराव कांबळे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, विद्युत अभियंता इसरार बेग आदी उपस्थित होते.

        शहरातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, माजी सैनिक, महानगरपालिकेचे विभागप्रमुख, विविध संस्थांचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी व कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला.

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.