खोतवाडीत घरासमोरून १ लाख २० हजारांची दुचाकी चोरीला
खोतवाडी :कयुम शेख
दि .२०: घरासमोर हँडल लॉक करून लावलेली सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना खोतवाडी येथे घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बी.एन.एस. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल सखाराम यादव (वय ५०, व्यवसाय मागपाळी, रा. पार्वती इंडस्ट्रीजसमोर, निळापट्टा कारखाना, विठुमाऊली किराणा दुकानाजवळ, खोतवाडी) यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एमएच ०९ सीएस ७०४४ घरासमोर हँडल लॉक करून लावली होती.
दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. चोरीस गेलेली दुचाकी काळ्या रंगाची असून त्यावर लाल पट्टा आहे. तिचा चेसिस क्रमांक MDIWHА11EWC9M33418 व इंजिन क्रमांक HA11EFC9M37172 असा आहे.
याबाबत विठ्ठल यादव यांनी दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री ७.१३ वाजता शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गु.र.नं. ४१६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल १६३१ पाटील यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल २०५७ सुतार करीत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.