संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि .२३ ;विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला उद्योजकतेची नवी दिशा देत संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘एचव्हीएसी क्षेत्रातील उद्योजकतेचा अनुभवकथन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.कार्यक्रमात श्री. निशिकांत सालवेकर आणि श्री. केदार गुर्जर यांनी एचव्हीएसी क्षेत्रातील प्रत्यक्ष उद्योगानुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. उद्योजकतेच्या संधी, व्यवसाय उभारणीतील आव्हाने, ग्राहकांच्या बदलत्या गरजा, तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व, व्यवसायातील सातत्य, जोखीम व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतः रोजगार निर्माण करणारा उद्योजक बनण्याची मानसिकता विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या अनुभवकथनातून देण्यात आला.

यावेळी पदवी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. स्वप्निल थिकणे, पदविका यांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, शॉर्ट टर्म अभ्यासक्रम विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, प्रा. मुजमिल बेपारी तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विशाल तेली यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी जागतिक उद्योजक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तंत्रज्ञान, कौशल्य आणि सर्जनशील विचारांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी भविष्यात सक्षम उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण व्हावी अनुभवातून प्रेरणा, कौशल्यातून संधी आणि नवकल्पनेतून उद्योगनिर्मिती हा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.