Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी –विजय मकोटे
दि.२४: हुपरी येथील चर्मकार समाजासाठी आरक्षित असलेल्या व शासकीय ताब्यातील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या केलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी उच्चस्तरीय त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आमदार आवाडे यांनी दिलेल्या निवेदनात, हुपरी येथील जुना सर्व्हे नं. १८४ (गट क्र. ९२५/८) मधील क्षेत्र हे.१५.७३ आर क्षेत्रापैकी चर्मकार समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी आरक्षित असलेली हे ६.३६ आर जमीन आणि सरकारी ताब्यातील हे ७.१७ आर जमिनीवर प्रशासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेऊन कागदपत्रांमध्ये हेरफेर करत अनधिकृत ताबा मिळवून ही जमीन हडपल्याचा आणि तिची बनावट विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या अनुषंगाने जमिनीशी संबंधित सर्व फेरफार, खरेदीखत व महसुली नोंदींची निष्पक्ष तपासणी केली जाणार आहे, अनधिकृत ताबा मिळवणाऱ्या आणि घोटाळ्यात सामील असलेल्या घटकांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाणार असून हडप केलेली जमीन पूर्ववत चर्मकार समाज व संबंधित संस्थेच्या नावे वर्ग करून बाधित समाजाला न्याय मिळवून दिला जाणार आहे.
आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रावर महसूल मंत्र्यांनी तात्काळ प्रशासकीय कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, प्रकरणात निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी पुढील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर या अधिकाऱ्यांची संयुक्त चौकशी समिती गठीत केली आहे.
महसूल मंत्र्यांच्या या थेट आदेशानंतर हुपरी परिसरातील संबंधित भूमाफिया आणि संशयितांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रमुखांच्या सहभागामुळे या चौकशीत अनेक मोठे चेहरे आणि प्रशासकीय साखळी उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.