महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या टेक्स्टाईल विंग अध्यक्षपदी आमदार राहुल आवाडे यांची निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
दि.३१: महाराष्ट्रातील व्यापार, कृषीक्षेत्र आणि उद्याेगांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या टेक्स्टाईल विंग च्या अध्यक्षपदी आमदार राहुल आवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वस्त्राेद्याेगातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, वस्त्रनगरी इचलकरंजीसह राज्यातील वस्त्राेद्याेगाच्या विकासासाठी कार्य लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर साेपवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील वस्त्राेद्याेग हा शेतीनंतर सर्वाधिक राेजगार देणारा महत्त्वाचा घटक आहे. सध्या सूतगिरण्या, सायझिंग, पाॅवरलूम, प्राेसेसिंग यासह संपूर्ण वस्त्राेद्याेग विविध आव्हानांना ताेंड देत आहे. वीज दर, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, निर्यातीस चालना आणि शासकीय याेजनांचा प्रत्यक्ष लाभ घटकांपर्यंत पाेहाेचवणे, वस्त्राेद्याेगाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत घेतलेली सक्रिय भूमिका यासारख्या अनेक मुद्यांवर आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
आमदार आवाडे यांच्या निवडीमुळे राज्यातील वस्त्राेद्याेगाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध औद्याेगिक संघटना, व्यापारी मंडळे, वस्त्राेद्याेग प्रतिनिधी आणि मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
इचलकरंजी हे देशातील प्रमुख वस्त्राेद्याेग केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील यंत्रमागधारक, उद्याेजक, व्यापारी आणि कामगारांच्या विविध समस्या साेडविण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील वस्त्राेद्याेगाला नवी दिशा मिळून उद्याेगाच्या विकासासाठी प्रभावी धाेरणात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.