इचलकरंजीत अवैध मटका जुगारावर शिवाजीनगर पोलिसांचा छापा; ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.१ : इचलकरंजी शहरातील आय.जी.एम. हॉस्पिटल परिसरातील मोतीळ चौक येथे सुरू असलेल्या कथित अवैध मटका जुगारावर शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून ४ हजार ९०० रुपये रोख रक्कम व तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोतीळ चौक परिसरात अवैधरीत्या मटका जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करीत घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईत ४,९०० रुपये रोख तसेच ३० हजार रुपये किमतीचे तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, असा एकूण ३४,९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी दिलीप गणपती हारगे (वय ६०), अजित बाळासो कोरवी (वय ३०), अभिजित नवरंग देशमाने (वय ४२) आणि सिद्धार्थ लहू कोकीतकर (वय १९), सर्व रा. इचलकरंजी, यांच्यासह अनिल उर्फ बबलू पवार व मोहन कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यातील दोघे मिळून आले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७४०/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद ममाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार सदाम सन्दी, गणेश सन्दी, प्रमोद चव्हाण व विकास चौगुले यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.