काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे ‘आराेग्यम’चे लाेकार्पण

निराेगी आराेग्य व जागरुक समाज निर्मितीचा संकल्प

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि.२ : ‘आराेग्यम’ हे केवळ एक पुस्तक नाही, तर निराेगी समाजाच्या निर्मितीसाठी आमचा एक संकल्प आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आराेग्य जागरूकतेचा संदेश पाेहाेचविणे, निराेगी जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकाेन निर्माण करणे आणि आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत याेग्य पावले उचलण्यास प्रेरित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे, असे प्रतिपादन काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड यांनी केले.


आराेग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आजारांची प्राथमिक लक्षणे वेळेत ओळखणे आणि निराेगी जीवनशैलीचा सकारात्मक संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पाेहाेचविण्याच्या उद्देशाने काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे प्रकाशित ‘आराेग्यम’ या आराेग्य जागरूकता पुस्तकाचा लाेकार्पण समारंभ प्रमुख पाहुणे रामविलास मुंदडा यांचे हस्ते आणि जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष नितीन धूत, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे मंत्री विनीत ताेषनीवाल, महेश सेवा समिति अध्यक्ष द्वारकाधीश सारडा, डाॅ. एस. पी. मर्दा, प्रदेश सहसचिव सुशिल इनानी, किम्स, युएआयएमएस हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. मिलिंद पारीख, फिजिओथेरिस्ट डाॅ. ममता बियाणी, संपादक समिति प्रमुख कृष्णकुमार धूत, तहसील माहेश्वरी सभा अध्यक्ष दयानंद बाहेती, नवयुवक मंडल अध्यक्ष अखिल बाहेती यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी बांगड बाेलत हाेते.
या महत्त्वपूर्ण समाजाेपयाेगी प्रकल्पाचे प्राेजेक्ट चेअरमन विनय बाल्दी, कृष्णकांत भूतडा आणि भरत साेनी आहेत. ‘आराेग्यम’ हे केवळ आराेग्यविषयक पुस्तक नसून, निराेगी आणि जागरूक समाजाच्या निर्मितीचा एक सकारात्मक संकल्प आहे. आराेग्याबाबत भीती निर्माण करण्याऐवजी जागरूकता, सकारात्मक विचार आणि याेग्य वेळी याेग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या पुस्तकात कान, नाक, घसा, अंतःस्त्रावशास्त्र, त्वचाविज्ञान, नेत्रविज्ञान, मज्जाविज्ञान, अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ न्यूराेलाॅजी यासह एकूण 24 महत्त्वपूर्ण आराेग्यविषयक विषयांचा समावेश करण्यात आला आहे.या कार्यक्रमास अनेक मान्यवर व ज्येष्ठ समाजबांधव, मातृशक्ती आणि युवाशक्तीची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.