सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ नियोजनाच्या अनुषंगाने शहरातील सर्व शासकीय यंत्रणांचे समवेत पुर्वतयारी बैठक संपन्न.

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.४: दि.१४ सप्टेंबर २०२६ पासुन गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इचलकरंजी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन शहरवासीयांना अत्यंत आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी महापालिका,पोलिस यासह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या अधिकारी यांचे समवेत संयुक्त बैठक महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी पोलीस उप.अधिक्षक विक्रांत गायकवाड, अति.आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली होती.


सदर बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील यांनी येणारा गणेशोत्सव शहरातील सर्व नागरिकांना अत्यंत चांगल्या आणि आनंदी वातावरणात साजरा करणेत यावा यासाठी शहरातील सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी योग्य पद्धतीने समन्वय साधून काम करावे असे आवाहन केले.
या अनुषंगाने शहरातील गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्व रस्ते तातडीने दुरुस्ती करणेचे तसेच श्रीगणेश मूर्तींना अडथळा निर्माण होत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणेचे आदेश संबंधित विभाग प्रमुख यांना दिले. तसेच गणेशोस्तवाच्या अनुषंगाने आवश्यक कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करणेच्या त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण होत असलेल्या विद्युत तारांची उंची आवश्यकते नुसार वाढविण्यासाठी एम.एस.ई. बी. प्रतिनीधी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेशी समन्वयक साधून कार्यवाही करणे तसेच गणेशोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक देखावे तसेच गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असते त्यामुळे शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणेच्या सुचना दिल्या.
याचबरोबर शहरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट किंवा सार्वजनिक बोअरिंगच्या विद्युत कनेक्शन मधुन आपल्या मंडपासाठी बेकायदेशीर आणि अनाधिकृतरित्या विद्युत कनेक्शन जोडून घेतलेस संबंधित सार्वजनिक मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी आयुक्त यांचे कडून देण्यात येत आहे.
या बैठकीसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परिक्षक आरती खोत, सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा. आयुक्त सुनिल शिंदे, रामचंद्र कांबळे, नितिन बनगे, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसाद अवघडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एस. दातार,आय.जी.जी.एच.चे डॉ. एम.एम. बागवान,कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शहर अभियंता बाजीराव कांबळे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले,शहर वाहतूक नियंत्रण शाखा सहा. पोलिस निरिक्षक व्हि. एस. शिंदे, माजी सहा. आयुक्त विजय राजापुरे,शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, डॉ . प्राची ढाले, रेकॉर्ड किपर सदाशिव गोनुगडे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उद्यान पर्यवेक्षक प्रशांत आरगे,अग्निशमन अधिकारी प्रणव कांबळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, आदी अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.