Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.८ : इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील विकास आराखड्यातील विविध विकासकामांसाठी आरक्षित जागा संपादनासाठी १०० काेटी रुपयांचा विशेष निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, शहराच्या विकासातील एक माेठा आर्थिक अडसर दूर झाला आहे.
इचलकरंजी शहराच्या विकास याेजनेत अनेक भूखंड रस्ते, उद्याने, शाळा, दवाखाने, खेळाची मैदाने आणि सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. मात्र, या जागांच्या भूसंपादनाचा माेबदला देण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्प रखडले आहेत. संबंधित जागामालकांना माेबदला न मिळाल्यामुळे कायदेशीर अडचणी व विकासकामांना ब्रेक लागत हाेता. शिवाय जागा मालकास माेबदला वेळेत मिळत नसल्याने काही व्यापारी, एजंट हे कमी दरात करार करून जागा हडपण्याचा प्रयत्नात असून करीत आहेत. त्याचबराेबर लाेकप्रतिनिधीना हाताशी धरून कायदेशीर नाेटीस देऊन महानगरपालिकेकडून संबंधित जागेवर टाकण्यात आलेले आरक्षण आरक्षण रद्द करुन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर टीडीआरनुसार हाेणारी रक्कम घेण्यास जागा मालक नकार देत असल्याने विकासकामात अडचणी निर्माण हाेत असल्याबद्दल आमदार आवाडे यांनी सविस्तर विवेचन केले.
या सर्व पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी राज्य शासनाकडे विशेष आर्थिक तरतुदीची मागणी लावून धरली हाेती. १०० काेटींच्या या भरीव निधीमुळे महापालिकेला जागांचे तातडीने भूसंपादन करून ज्या कारणांसाठी त्या आरक्षित केल्या त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करता येणार आहे. या माध्यमातून शहराचा सुनियाेजित विस्तार हाेण्याबराेबरच वाढत्या लाेकसंख्येला पुरेशा सार्वजनिक सुविधा उपलब्ध करणे शक्य हाेईल. या निर्णयाचे इचलकरंजी शहरातील नागरिक, व्यावसायिक आणि राजकीय वतुर्ळातून जाेरदार स्वागत हाेत असून आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन हाेत आहे. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक रवी रजपुते उपस्थित होते.
‘इचलकरंजी शहराचा कायापालट करण्यासाठी सुनियाेजित पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे.
आरक्षित जागांच्या माेबदल्याचा प्रश्न सुटल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे आता प्रत्यक्षात येतील.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आमदार राहुल आवाडे यांनी म्हटले आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.