सांगलीत ‘अँकर व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम’अंतर्गत खरेदीदार: विक्रेता मेळावा उत्साहात

 सांगली: अय्यान पटेल

दि.५: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या (MSSIDC) व जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपक्रमाची Implementing Agency म्हणून मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि., पुणे यांच्या वतीने सांगली येथे ‘Raising & Accelerating MSME Performance (RAMP) – Anchor Vendor Development Program’ अंतर्गत खरेदीदार-विक्रेता मेळावा उत्साहात पार पडला.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे होत्या. विजयनगर येथील हॉटेल पर्ल मध्ये आयोजित या कार्यक्रमास कोकण रेल्वे कॉर्पोरिेशन लिमिटेड, मुंबईच्या उपमुख्य साहित्य व्यवस्थापक  नीला सेल्वन, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक निखिल सावळे, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर, मिटकॉनचे सांगली विभागीय व्यवस्थापक जगन्नाथ माळी आणि पुणे मिटकॉनचे विभागीय व्यवस्थापक सचिन चव्हाण, एनआयबीईचे व्यवस्थापक रोहन माळी आदि उपस्थित होते.

            सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना नामांकित उद्योगांच्या पुरवठा साखळीशी जोडणे, त्यांना थेट खरेदीदारांशी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीला चालना देणे हा मेळाव्याचा उद्देश होता. अशा उपक्रमांमधून जिल्ह्यातील स्टार्ट अपची संख्या वाढण्यास, दर्जेदार उत्पादने निर्मिती करण्यास व सांगली जिल्ह्याची ओळख तयार करण्यात मदत होईल, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी करून स्थानिक उद्योजकांसाठी असे उपक्रम मदतीचे ठरतील, अशी आशा व्यक्त केली.

            कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र, सांगलीचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी NIBE Ltd., चाकण-पुणे, Indian Oil Corporation Ltd. (IOCL), मुंबई, JSW Ltd., रत्नागिरी, Dalmia Bharat Sugar Ltd., कोल्हापूर, Konkan Railway Corporation Ltd. (KRCL), बेलापूर-नवी मुंबई आणि Samruddhi Industries, Sangli या अँकर कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

            मेळाव्यात सह विभागीय व्यवस्थापक सुहास पवार, उप साहित्य व्यवस्थापक, कोल्हापूर राजीव मिश्रा तसेच असोसिएशनचे अध्यक्ष व प्रतिनिधी यांच्यासह विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. अँकर कंपन्यांच्या प्रोक्युअर रिक्वायरमेंट, व्हेंडर रजिस्ट्रेशन व ऑन बोर्डिंग प्रोसेस, क्वालिटी स्टँडर्स व टेक्निकल रिक्वायरमेंटस्, एमएसएसई उद्योगांसाठी आऊटसोर्सिंग ऑपॉर्ज्युनिटीज, उत्पादन व तांत्रिक क्षमतांचा व्यावसायिक वापर, बायर सेलर मीट तसेच व्हेंडर डेव्हलपमेंटच्या संधी याबाबत माहिती देण्यात आली.

            दुपारच्या सत्रात विविध अँकर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थांना आवश्यक असलेल्या वस्तू, सेवा, तांत्रिक निकष, विक्रेता नोंदणी प्रक्रिया आणि खरेदीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर Buyer-Seller One-to-One Interaction घेण्यात आले. या माध्यमातून MSME उद्योजकांना संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून व्यवसायाच्या संधी जाणून घेता आल्या.

            प्रास्ताविक विद्या कुलकर्णी यांनी केले. मिटकॉन आणि एमसीईडीच्या माध्यमातून ६०० पेक्षा ७०० लोकांना आपण मोफत प्रशिक्षण देण्यात येते असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या उत्तम संयोजनाबद्दल मिटकॉन आणि डीआयसी यांचे अभिनंदन केले. मिटकॉन संस्थेच्या कामकाजाबद्दल सादरीकरण करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.