सेवा संकल्प अभियानांतर्गत निवडे येथे विविध उपक्रम उत्साहात

ज्येष्ठांचा सन्मान, महिला सक्षमीकरणासह पर्यावरण व शिक्षणाला प्रोत्साहन  

कोल्हापूर: प्रविण भोसले

दि.२: सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामपंचायत निवडे येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान, आशीर्वादाचा दिवा, लखपती दीदींच्या घरी भेट, बचत गटांच्या उत्पादनांची पाहणी, प्राथमिक शाळेला भेट, वृक्षारोपण तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला भेट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

     जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच पंचायत समिती गगनबावड्याच्या गटविकास अधिकारी अलमास सय्यद यांनी विविध उपक्रमांना भेट देऊन ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली.वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तर ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानातून सामाजिक संस्कारांची जपणूक करण्यात आली. लखपती दीदी व बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या भेटीतून युवकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात आले. तसेच प्राथमिक शाळेच्या भेटीद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यात आले.या विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा, संवेदनशीलता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि ग्रामविकासाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमास सरपंच वंदना पाटील, उपसरपंच अस्लम मलकापुरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद झोरे, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्तरावरील कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.