‘इमारतींच्या पलिकडची वास्तुकला’ विषयावर सत्येंद्र भगत यांचे व्याख्यान अल्ट्राटेक उत्कृष्ट आर्किटेक्ट पुरस्काराने हाेणार शहरातील आर्किटक्ट यांचा गाैरव

इचलकरंजी – हबीब शेखदर्जी 
दि.१० : जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत असाेशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील प्रसिध्द आर्किटेक्ट कृष्णकांत साेनटक्के, विठ्ठल ताेडकर आणि अरिहंत चाैगुले यांचा अल्ट्राटेक उत्कृष्ट आर्किटेक्ट पुरस्कार देऊन गाैरव करण्यात येणार आहे. त्याचबराेबर कन्साेर्टियम आर्किटेक्ट्स पुणेचे आर्किटेक्ट सत्येंद्र भगत यांचे ‘द आर्किटेक्चर बियाँड बिल्डिंग’ (इमारतींच्या पलिकडची वास्तुकला) या विषयावर व्याख्यान आयाेजित करण्यात आले आहे, अशी माहिती असाेशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे प्रेसिडेंट राजेंद्र खंडेराजुरी, सेक्रेटरी विकास नाईक, अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर नितीन धुत यांनी दिली.
शुक्रवार ९  ऑक्टाेबर राेजी सायंकाळी ६.३० वाजता ताेष्णीवाल गार्डन याठिकाणी हा पुरस्कार वितरण समारंभ अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय मार्केटींग हेड दीपक किंगर आणि टेरीटाेरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांचे हस्ते हाेत आहे. इचलकरंजी शहर परिसरासह विविध ठिकाणी निवासी आणि औद्याेगिक क्षेत्रात विविध प्रकल्पांची उभारणी करण्यासह आर्किटेक्ट क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या आर्किटेक्ट यांना पुरस्काराने गाैरविण्यात येणार आहे. तर आर्किटेक्ट सत्येंद्र भगत यांचा यानिमित्ताने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी भरत केटकाळे, नितीन शेट्टी, विवेक सावंत, सचिन बोरा रवींद्र ताेरस्कर, गिरीश माेकाशी, सुहास रुग्गे, प्रकाश मालवीय, अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर हर्षल धुत, विभागीय तांत्रिक प्रबंधक काेल्हापूर सागर छांगाणी, चॅनेल रिलेशनशीप मॅनेजर कल्पक मेहता आदी उपस्थित हाेते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.