डॉ. संदीप वाटेगावकर यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

सांगली : अय्यान पटेल 
दि.१२:बोरगावचे (सांगली) सुपुत्र व जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक तथा रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांना अविष्कार फाउंडेशन, इंडिया या संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्स, मुंबई च्या संचालिका वृषाली चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. वाटेगावकर यांनी हा पुरस्कार पत्नी प्राजक्ता आणि कन्या सई यांच्यासमवेत स्वीकारला. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.डॉ.वाटेगावकर यांच्या संशोधनाला भारत, जर्मनी व युके सरकारची मिळून 6  पेटंट प्राप्त झाले असून त्यांना अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक शात्रज्ञांच्या यादीत स्थान मिळाले आहे. डॉ. वाटेगावकर यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांचे ५० हून अधिक संशोधनपर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. 
        डॉ. संदीप वाटेगावकर म्हणाले, “हा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान आहे. हा पुरस्कार माझ्या शैक्षणिक व संशोधन कार्याची पोचपावती असून, यापुढेही शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंबीय, किसन वीर महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो.”
या पुरस्काराबद्दल  जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर , सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.