विभागीय कबड्डी स्पर्धेत इचलकरंजीच्या नाईट काॅलेजला अजिंक्यपद

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

दि.२३ : येथील डायनॅमिक स्पाेर्टस् क्लबच्या क्रीडांगणावर संपन्न डीकेटीई महाविद्यालयार्ते शिवाजी विद्यापीठ काेल्हापूर आयाेजित विभागीय कबड्डी पुरुष स्पर्धेत इचलकरंजीतील नाईट काॅलेजच्या संघाने अजिंक्यपद मिळविले. तर आण्णासाहेब डांगे काॅलेजला उपविजेतेपद मिळाले. त्याचबराेबर डीबीए काॅलेज पेठवडगांव संघाने तृतीय तर भाेगावती महाविद्यालय कुरुकली संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील 22 संघांनी सहभाग घेतला हाेता. यातील अनेक सामने अटीतटीचे तर काही सामने हे एकर्तीच झाले. त्यातून नाईट काॅलेज इचलकरंजी, भाेगावती महाविद्यालय कुरुकली, डीबीए काॅलेज पेठवडगांव व आण्णासाहेब डांगे काॅलेज हातकणंगले या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य ेरीत प्रवेश केला. उपांत्य ेरीत नाईट काॅलेज विरुध्द भाेगावती कुरुकली आणि डीबीए काॅलेज विरुध्द आण्णासाहेब डांगे काॅलेज यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नाईट काॅलेजने भाेगावती संघाचा 19 गुणांनी पराभव केला. तर दुसèया उपांत्य सामन्यात आण्णासाहेब डांगे काॅलेजने डीबीए काॅलेज पेठवडगांवर अवघ्या 3 गुणांनी निसटता विजय मिळविला. त्यानंतर नाईट काॅलेज आणि आण्णासाहेब डांगे काॅलेज यांच्यात अंतिम लढत हाेऊन त्यामध्ये नाईट काॅलेजने विजय प्राप्त केला.

या स्पर्धेत प्राे कबड्डी स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने नांवलाैकिक मिळविलेल्या काही खेळाडूंनी विविध संघातून खेळत आपल्या काैशल्याची चुणूक दाखविली. त्यामध्ये साहिल पाटील (भाेगावती महाविद्यालय), वैभव राबाडे (शाहू काॅलेज), साैरभ फगरे (नाईट काॅलेज इचलकरंजी) यांचा समावेश हाेता.

स्पर्धेनंतर डीकेटीईचे संचालक प्रा.शेखर शहा, काेल्हापूर विभागीय क्रीडा परिषद सचिव किशाेर खिलारे, ओंकार खानाज, प्रविण ाटक, बाबासाहेब काेळेकर, रमेश पाटील, आदींच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी पंच म्हणून प्रकाश माेहिते, मनाेज मगदूम, धीरज ठाणेकर, अमर चिंदे, कपिल कांबळे, बाळासाे चव्हाण, कार्तिक बचाटे, कुबेर पाटील, रमजान देसाई, अभिजित पाटणे, ऋतुराज चव्हाण, अमाेल म्हेत्रे, अशपाक नदाफ यांनी काम पाहिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.